Sunday, September 27, 2009
दुःख पर्वता एवढे।
वरील ओळी या तुकाराम महाराजांच्या अभंगातील आहेत.
जव हे तृणधन्य आहे, ते अगदी गवताच्या बिया ऐवढे सुक्ष्म असते.
पाडे म्हणजे सारखे.
माणसाच्या जीवनात चढ़- उतार असतात.
नाण्याच्या जश्या दोन बाजू असतात,
तसेच माणसाच्या जीवनाला सुख आणि दुःख या दोन बाजू असतात.
माणसाला अनुभवास आलेले सुख कितीही जास्त असले तरी ते जवा ऐवढे सुक्ष्मच वाटत असते.
आणि दुःख हे कितीही कमी असले तरी ते पर्वता ऐवढे मोठेच वाटत असते.
Friday, September 25, 2009
वरील दहाही वाक्यांना कुठल्याही प्रकारचा ठोस आधार नाही. जर असे झाले तर तसे होऊ शकते. त्यामुले पहिल्या वाक्यातील सत्यता सिद्ध झाल्याशिवाय दुसरे वाक्य सत्य होऊ शकत नाही.
रस्ता ओला झाला आहे, हे आपल्याला डोळ्यांनी दिसते. स्पर्स केल्यानेही ओलाव्याची जाणीव होते। रस्ता ओला झाला आहे हे दिसताच आपण पाऊस पडला असणार असा अंदाज बांधतो. पण कधी कधी डोळ्यांनी पाहुनदेखिल घेतलेला अंदाज खोटा ठरू शकतो. पाऊस पडला आहे हे आपण प्रत्यक्ष पाहिले नाही परन्तु पावासामुळयेच रस्ता ओला झाला असणार या अंदाजावर चटकन लक्ष केंद्रित होत असते. अंदाजे वर्तवीलेले वाक्य धोकाही देऊ शकतात. कदाचित रस्त्यावरून जाणा~या पाण्यानी भरलेला टयांकरने रस्ता ओला झालेला असावा. किंवा ब~याच काही गोष्टी कारणीभूत असू शकतात.
अश्या प्रकारची काही वाकये पुढील प्रमाणे
उदा.
१) रस्त्यावर काचेचे बारीक बारीक चौकोनी तुकडे पडलेले आहेत म्हणजे गाडीचा अपघात झाला असणार. २) थोडया अंतरावर धुर निघत असल्याचे दिसत आहे म्हणजे आग लागली असणार
३) प्लाट फॉर्मवर एका ठिकाणी माणसांचा घोळका दिसतोय म्हणजे ट्रेनमधून कोणीतरी पडल असणार
४) नाकाला काहीतरी जळत असल्याचा वास येत आहे म्हणजे कुठेतरी सॉर्टसर्किट झाले असणार
५) पोलिसांनी एखाद्या व्यक्तिला पकडून घेऊन जात असल्याचे दिसताच त्या व्यक्तिने काहीतरी अपराध केला असणार
६) ट्रेनमध्ये दोन व्यक्तींमधील जोरदार चाललेले वक्तव्य ऐकताच तंटा झाला असणार
७) चालती गाडी अचानक थांबत थांबत बंद पडल्यास यांत्रिक समस्या झाली असणार
८) घरातून दप्तर घेऊन विद्यार्थी निघालाय म्हणजे तो कोलेजला जात असणार
९) दुकानात माणसांची गर्दी आहे म्हणजे ते सामान घेत असणार
१०) रेल्वे स्टेशनवर माणसे उभी आहेत म्हणजे ते ट्रेनची प्रतिक्षा करता असणार
वरील गोष्टींसाठी डोळये, कान व नाक या द्न्यानेंद्रियांची मदत झाली.
तरीदेखिल लावलेले अंदाज चुकिचेही ठरु शकतात.