Sunday, September 27, 2009

सुख पाहता जवा पाडे,
दुःख पर्वता एवढे।
वरील ओळी या तुकाराम महाराजांच्या अभंगातील आहेत.
जव हे तृणधन्य आहे, ते अगदी गवताच्या बिया ऐवढे सुक्ष्म असते.
पाडे म्हणजे सारखे.
माणसाच्या जीवनात चढ़- उतार असतात.
नाण्याच्या जश्या दोन बाजू असतात,
तसेच माणसाच्या जीवनाला सुख आणि दुःख या दोन बाजू असतात.
माणसाला अनुभवास आलेले सुख कितीही जास्त असले तरी ते जवा ऐवढे सुक्ष्मच वाटत असते.
आणि दुःख हे कितीही कमी असले तरी ते पर्वता ऐवढे मोठेच वाटत असते.

1 comment: