Thursday, May 13, 2010

चैम्पियन ऑफ चैम्पियनसपर्यंतचा प्रवास
भारतातील प्रत्येक खेळाला एक स्टार लाभलेला आहे। क्रिकेट म्हटल की सचिन तेंडुलकर, बुद्धिबळ म्हटल की विश्वनाथन आनंद, फुटबाल म्हटल की बायचुंग भूतिया, बडमिंटन म्हटल की सायना नेहवाल, म्हटल की पी टी उषा आणि शरीरसौष्टवपटू म्हटल की सर्वांच्याच मुखातून नाव उच्चारले जाते ते चैम्पियन ऑफ चैम्पियन सुहास खामकरचे. या पठ्याने एक दोन नव्हे तर तब्बल चार वेळा 'भारत श्री' तिन वेळा 'महाराष्ट्र श्री' त्याची भारतीय संघात आरनल्ड क्लासिकमध्ये प्रथमच निवड झाली आहे. या शरीरसौष्टवपटूने नुकतेच शिवाजी पार्क येथे झालेल्या स्पर्धेत 'महाराष्ट्र श्री', 'पराग श्री', 'लोकाधिकार श्री' किताब पटकविले आहेत. आता त्याचे पुढचे लक्ष्य आहे ते मिस्टर ओलिम्पियामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे.
शरीराने दुबळया असनार्या सुहासला लहानपणी शरीरसौष्टवपटूचे शरीर इतके बलाढ्य असते हे पाहून देखिल त्याचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. परंतु त्याने स्वता जेव्हा या क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा आपणही अशीच बलाढ्य देहयष्टी करू शकतो याची जाणीव झाल्याचे त्याने म्हटले आहे.
सुहास हा मुळचा कोल्हापूरचा. त्याचे वडिल मधुकर खामकर आणि भाऊ सुधीर खामकर हेही पहेलवानकी करायचे, असे असताना सुहासनेही घरची परंपरा अशीच पुढे चालवावी असा आग्रह त्याच्यावर कधीच लादण्यात आला नव्हता. एवढेच नव्हे तर त्याने वकील, इंजिनीअर , डॉक्टर, आयपीएस आशा अपेक्षाही त्याच्यावर लादण्यात आल्या नव्हत्या. कोल्हापुरचे वातावरण त्यावेळी पहेलवानकीने भरलेले होते. इतरांप्रमाने आपल्याही शरीराला बळकटी मिळावी आणि आपले शरीरही बलाढ्य व्हावे यासाठी त्याने प्रथम महानगर पालिकेच्या राजारामपुरी व्यायाम शाळेत सरावाला सुरुवात केली। तेथील स्थानिक शरीरसौष्टव स्पर्धेत त्याने तृतीय क्रमांक पटकविला. त्यामुले घरातल्या माणसांनी त्याच्याकड़े यासंदर्भात बरेच लक्ष्य दिले. आणि यामुलेच मी या क्षेत्रताच करिअर घडवायच मनोमन ठरविल्याचे त्याने म्हटले आहे. कोल्हापुरातील विभीषण पाटिल व्यायाम शाळेत जोरदार सरावास सुरुवात केली. सुहासने तेथे सहा सात वर्षे सरावात सातत्य राखले. त्यादरम्यान तो जिल्हापातळीवर व पश्चिम महाराष्ट्राचा अव्वल दर्जाचा शरीरसौष्टवपटू ठरला. सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे येथे अनेक स्पर्धा जिंकल्याचे तो सांगतो. कोल्हापुरातील शाहू साखर कारखान्याचे मालक विक्रमसिंह घाडगे यांनी आर्थिक मदत सुरु केली. आणि व्यायामासाठी मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. सुहासने मुंबईला आल्यावर स्वतः निवडलेल्या या क्षेत्रात जिद्द पणाला लावून अनेक स्पर्धांवर वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे पोलिस, नेव्ही, एअरफाॅर्स, आर्मी, रेल्वे आणि बँक यांची सुहासकड़े रांग लागली ती आमच्या बाजूने खेळावे यासाठी. त्याने विचाराअंती निवड केली ती रेल्वेची. चांगली सर्विस मिळाल्यानंतरही तो थंडावला नाही. त्याने रेल्वेच्या वतीने खेळताना राष्ट्रीय पातळीवर पाच पदके जिंकली आहेत जी आतापर्यंत रेल्वेसाठी कोणीही जिंकलेली नाहीत. दिवसातून सात तास सराव करणार्या सुहासने प्रेमचंद डोगरा आणि महाराष्ट्राचे प्रकाश करंडे यांना आपले आदर्श मानले आहे. आतापर्यंत मिळविलेल्या यशाचे श्रेय तो आपले आई, वडिल, भाऊ, पत्नी, मित्र आणि स्पोंनसरशिप देणारे यांना देतो. तसेच बरेच जण कमी वेळात जास्त प्रगती करण्यासाठी शोर्टकचा वापर करीत असतात, त्यामुळे तो या क्षेत्रात प्रवेश करणार्यांना संदेश देतो की, ' सरावात प्रयत्न आणि चिकाटी जर सातत्याने राखली तर यश मिळते. त्यामुळे शोर्टकट न वापरता जिद्द पणाला लावा'.
भारताचा तिरंगा या खेळाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर फडकविण्याची महत्वकांक्षा असल्याचेही त्याने म्हटले आहे. 'मला जर जागतिक पातळीवरचे चांगले प्रशिक्षक मिळाले तर मी अव्वल दर्जाचा शरीरसौष्टवपटू ठरू शकतो. तसेच प्रायोजक मिळाले तर अधिक जोरदार सराव होऊ शकतोअसे त्याने म्हटले आहे.
गोवा येथील मडगाव येथे झालेल्या राष्ट्रिय शरीरसौष्टवपटू चैम्पियनशिपमध्ये महाराष्ट्रासाठी पहिल्यांदाच चैम्पियन ऑफ चैम्पियनसचा किताब पटकविला आहे. त्याने या खेळाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारताचा तिरंगा फडकवावा हीच अपेक्षा.

No comments:

Post a Comment