Thursday, May 20, 2010

... हेच आहे ते मैदान, जे आशियातील सर्वात उंच हॉकीचे मैदान ठरले आहे. या हॉकी मैदानाचे नाव आहे 'एसष्ट्रोटर्फ' हॉकी मैदान. हे मैदान समुद्र तळापासून आठ हजार फूट उंचीवर आहे. सीपीडब्लूडीच्या देखरेखीखाली स्पोर्टीना कंपनीने या स्टेडीअमची निर्मिती केली आहे. या स्टेडीअमच्या निर्मितीसाठी ३ कोटी ५३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. या हॉकी मैदानाचे उद्घाटन क्रीडा मंत्री एम. एस. गिल यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी गिल यांनी हे मैदान भौगोलिक दृष्टया खेळाडूंसाठी सर्वात उपयुक्त आहे तसेच तेथील वातावरण खेळाडूंच्या आरोग्यासाठी चांगले आहे असे वक्तव्य केले होते. अझलनशाहा होकी स्पर्धेत भारतीय संघाने पाचव्यांदा किताब पटकावित चांगलीच कामगिरी केली आहे. या कामगिरीत सातत्यता राखत त्यांनी जगज्जेतेपद पटकवावे हीच अपेक्षा.

No comments:

Post a Comment