भारतामध्ये गेली अनेक शतके भारतीय सांकेतिक भाषा डेफ व्यक्तिंकडून वापरली जात आहे. भरतनाट्यमकिंवा भारतीय शुर्पनखेचे उदाहरण पाहता भारतामध्ये आयएसएल प्राचिन काळापासून अस्तित्वात असल्याचे निदर्शनात येत. आयएसएलचा अभ्यास १९८० च्या पूर्वार्धात भारतामध्ये शास्त्रीय पद्धतीने सुरु झाला.
भारतीय सांकेतिक भाषा ही भारतीय डेफ समाजाची एक अद्वितीय कृती आहे. वाचा आणि श्रवण दोष असलेल्या व्यक्तींची भारतीय सांकेतिक भाषा ही मायबोलीच. या भाषेला इतर भाषांप्रमाणे लिहिले जात नाही. मात्र दृश्य आणि श्राव्य या माध्यमातून शिकता येते. आणि व्हिडियो, कॉम्पुटर यांच्या सहाय्याने एकमेकांबरोबर अभ्यास करता येते. व्याकरण आणि भाषा याच्या प्रयोगानेच शिकता येते. आयएसएल ही भारताची आपली स्वत:ची भाषा आहे. ही भाषा दुसर्या भाषेशी संबंधित नाही. कोणत्याही विदेशी भाषेशीही प्रभावित नाही. भारतात दरवर्षी २७ हजार डेफ मुलं जन्माला येतात आणि पुढे ते आपापल्या क्षमतेनुसार व श्रवण क्षमतेनुसार आयएसएलचा वापर करत असतात. सध्या स्थितीत भारतात सुमारे १५ लाख व्यक्ती आयएसएलचा वापर करतात.
भारत आणि जवळपासच्या देशांमध्ये डेफ व्यक्तिंचा समुह बर्याच प्रमाणावर आहे. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या अनुमानानुसार भारतात डेफ व्यक्तिंची संख्या ४ मिलियन इतकी आहे. आणि भारतातील मोठ्या शहरांमध्ये या सांकेतिक भाषांवर प्रयोग होत असतात. सांकेतिक भाषेची सुरुवात इ.पू. ५ व्या शतकात किटीलसमध्ये झाली. आपल्याला बोलत येत नाही आणि आपले म्हणने इतरांना सांगण्यासाठी हातवारे हावभाव यांचा वापर केला जात असतो. भारतीय सांकेतिक भाषा केवळ भारताताच नाही तर बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळ या शेजारील देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. डॉ. मदन वशिष्ट, वुड वर्ड विल्सन आणि अलराक्जेशन यांनी मिळून केलेल्या संशोधन कार्यातूनच, सांकेतिक भाषा ही डेफ समुदायाचा एक विभिन्न अंग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१९९०च्या दशकात डॉ. उलरीक यांनी भारतीय उपखंडातील आयएसएलचा अभ्यास केला. आणि त्यांना येथे वापरण्यात येणार्या या भाषेत साम्य असल्याचे आढळून आले. पाकिस्तान, भारत, नेपाळ, बांगलादेश या देशात वापरले जाणारे व्याकरण एकच आहे. आपल्या देशात श्रवण दोष असलेल्या १० लाख व्यक्ती आणि पाच लाख हेअरींग इंपेड मुले या भाषेचा वापर करतात. आज २०१२ मध्ये या आकड्यांत अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. या भाषेला अधिक व्यापकता मिळावी यासाठी भारतात सांकेतिक भाषेचा पाठ्यक्रम२००१ मध्ये भारतीय पुनर्वसन परिषद (आर. सी. आय.) यांच्या सहयोगाने अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था (ए.वाय.जे.एन.आय.एच.एच.) या मुंबईतील संस्थेत सुरु करण्यात आला. तसेच ते आय.एस.एल. शिक्षक आणि इंटरप्रीटर्सही तयार करण्याचे प्रयत्न जोमाने करत आहेत. या संस्थेने २००८ मध्ये डिप्लोमा इन साईन लँग्वेज इंटरप्रीटर कोर्सचा (डि.एस.एल.आय.सी) प्रारंभ केला. या संस्थेची भारतात सात केंद्रे आहेत आणि ४५ प्रमाणपत्रधारक इंटरप्रीटर्स आहेत. डेफ व्यक्तिंचा समावेश हा अपंगत्व समुदायात केला जातो. या समुदायात सात प्रकारच्या अपंग गटाचा समावेश आहे. समाजात या समुदायाला समान अधिकार मिळावा यासाठी भारत देश विश्व स्तरावर करारबद्ध झाला आहे. या कार्यासाठी अली यावर जंग ही संस्था नेहमीच अग्रेसर असते. केवळ डेफ व्यक्तीच नाहीत तर नॉर्मल व्यक्तींही ही भाषा शिकण्यावर अधिक भर देत असल्याचे दिसते.
के. सी. मार्ग वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे पश्चिममुंबई ५० येथे असलेली अली यावर जंग या संस्थेची स्थापना ९ ऑगस्ट १९८३ रोजी झाली. सामाजिक न्याय आणि विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेशी संपर्क साधण्यासाठी ०२२-२६४० ०२१५ / ०२२८ असा दुरध्वीनी क्रमांक आहे तसेच ayjnihhmum@gmail.com संकेत स्थळही उपलब्ध आहे. अली यावर जंग आणि मुंबई विद्यापीठातील संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग (MCJ ) यांनी संयुक्तरीत्या एक वर्षाचा कालावधी असलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मिडिया ऍण्ड डिसऍबिलीटी कम्युनिकेशन या कोर्सची सुरुवात २०१२ सालापासून केली आहे. ऍक्सेसिबल मिडिया प्रोग्रामआणि युनिव्हर्सल डिझाईन हे या कोर्सचे वैशिष्ट्य आहे. मिडिया क्षेत्रात या स्पेशलायझेशनच्या आधारावर विद्यार्थी आपली कारकिर्द घडवू शकतो. या एक वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्सेसिबल मिडिया प्रोग्रामआणि प्रोडक्स शिकण्याची संधी आहे. ऍक्सेसिबल फॉर्मेटमध्ये शॉर्ट फिल्म्स बनविणे, डिझिटल मिडियाचे मार्केट वाढविणे, कॅप्शनिंग, ऑडिओ डिस्क्रिप्शन, भारतीय सांकेतिक भाषा आणि ऍक्सेसिबल संकेत स्थळ बनविणे हे केवळ शिकण्यासच नाही तर आपल्याला प्रॅक्टिकली करण्याची सुवर्ण संधी मिळते. या कोर्सची फी १९ हजार रुपये आहे मात्र हॉस्टेलची सुविधा पाहिजे असल्यास ३१,६०० अशी रक्कम आकारण्यात येते. हा कोर्स करण्याची संधी केवळ ज्यानी पत्रकारितेत डिप्लोमा किंवा डिग्री किंवा पब्लिक रिलेशन कोर्स केलेला असेल त्यांनाच मिळणार आहे.

------------------------------------------------------------------------------------------------
सर्वच डेफ मुलांनी भारतीय सांके
तिक भाषा शिकण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. तसेच इंटरप्रीट्र्स असलेले टिव्ही चॅनल्सही पाहिले पाहिजे. नॉर्मल व्यक्तिंनी ही भाषा शिकून डेफ समुदयाशी संवाद साधला पाहिजे. अनुसुचित यादीत या भाषेला स्थान मिळावे यासाठी अली यावर जंग प्रयत्न करत आहे. तंत्रज्ञानाकडे आकर्षित होण्यासाठी अली यावर जंग ही संस्था व्हीडिओ रिमोट इंटरप्रीटींग सर्विसचा वापर करत असून ते लोकप्रिय होण्यासाठी प्रयत्नही करत असल्याचे अली यावर जंग या राष्ट्रीय विकलांग संस्थेचे संचालक प्रो. आर. रंगासाई यांनी म्हटले आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment